मुंबई - दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अॅक्शन हिरो विद्युत जामवाल लवकरच 'कमांडो ३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 'कमांडो' आणि 'कमांडो २' चित्रपटातील त्याच्या अॅक्शन सिनची प्रेक्षकांवर छाप पडली होती. त्यामुळेच 'कमांडो ३' साठीही प्रेक्षक आतुर आहेत. या चित्रपटातील विद्युतचा इंट्रोडक्ट्री व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्युतची खास झलक पाहायला मिळते.
एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यामधले ३० ते ४० किंवा १ मिनिटांपर्यंतचे सिन आत्तापर्यंत समोर येत होते. मात्र, 'कमांडो ३' मधला तब्बल ५ मिनिटांचा सिन असलेला हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा हा हटके प्रयोग म्हणावा लागेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">