मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच मानवी संगणक अशी ओळख असणाऱ्या 'शकुंतला देवी' यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. विद्या बालनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खास गणितीय भाषेत प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.
-
Get ready to be enamoured by her wit, charm & of course, genius! Watch the video to know when #ShakuntalaDevi is coming to theatres near you!@sanyamalhotra07 @jisshusengupta @TheAmitSadh @anumenon1805 @sonypicsprodns @Abundantia_Ent @vikramix@sonypicsindia pic.twitter.com/6sJtDTcWSw
— vidya balan (@vidya_balan) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Get ready to be enamoured by her wit, charm & of course, genius! Watch the video to know when #ShakuntalaDevi is coming to theatres near you!@sanyamalhotra07 @jisshusengupta @TheAmitSadh @anumenon1805 @sonypicsprodns @Abundantia_Ent @vikramix@sonypicsindia pic.twitter.com/6sJtDTcWSw
— vidya balan (@vidya_balan) December 12, 2019Get ready to be enamoured by her wit, charm & of course, genius! Watch the video to know when #ShakuntalaDevi is coming to theatres near you!@sanyamalhotra07 @jisshusengupta @TheAmitSadh @anumenon1805 @sonypicsprodns @Abundantia_Ent @vikramix@sonypicsindia pic.twitter.com/6sJtDTcWSw
— vidya balan (@vidya_balan) December 12, 2019
मानवी संगणक अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवी या गणित विषयात अतिशय पारंगत होत्या. अनेक अवघड अवघड गणितीय समीकरणं त्यांनी बोटावर सोडवली आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या अचाट बुद्धीची गाथा 'शकुंतला देवी' या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहे. विद्या बालन यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा -'जयेशभाई जोरदार' चित्रपटात रणवीरसोबत 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी
अभिनेत्री सान्या मल्होत्राचीही यामध्ये महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. ८ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनू मेनन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर सोनी पिक्चर्स नेटवर्क अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
हेही वाचा -'चुलबुल पांडे' विरुद्ध 'बाली सिंग', 'दबंग ३' मध्ये होणार तगडी टक्कर