मुंबई - अभिनेता विक्की कौशल आगामी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. माणेकशॉ यांच्या जयंतीच्या निमित्ताने विकी कौशल यांने त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
सॅम माणेकशा हे सॅम बहादूर या नावाने लोकप्रिय होते. त्यांचा जन्म ३ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. माणेकशॉ यांच्यावर बनत असलेल्या बायोपिकमध्ये विकी त्यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
माणेकशॉ यांना श्रद्धांजली अर्पण करीत विक्कीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, ''कई नामों से पुकारे गये, एक नाम से हमारे हुये'' हा गीतकार गुलजार यांच्या आवाजातील व्हाईस ओव्हर ऐकायला मिळतो. माणेकशाम, मॅकीन्तोष, माणेकजी, सॅम माणेकशा अशा अनेक नावांनी त्यांना ओळखले जात असले तरी ''सॅम बहादूर'' या नावाने ते आपले बनले असा टेक्स्टही या व्हिडिओत पाहायला मिळतो.
कोण आहेत सॅम माणेकशॉ -
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे नाव ठाऊक नसलेला क्वचित एखादा भारतीय असेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी माणेकशा यांना मिळाली. भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल होते. त्यांचे पूर्ण नाव सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशॉ असे होते.
सॅम माणेकशा यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांची १०७ वा जयंती आहे.
हेही वाचा - 'राजी'नंतर पुन्हा एकदा मेघना गुलजारच्या 'या' चित्रपटात झळणार विकी कौशल, पोस्टर प्रदर्शित