ETV Bharat / sitara

Ramesh Bhatkar : भारदस्त आवाजाचा अभिनेता रमेश भाटकर यांचा स्मृतिदिन - Ramesh Bhatkar Memorial Day

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा आज तिसरा स्मृतिदिन आहे. कर्करोगाच्या आजाराने त्यांचे ७० व्या वर्षी निधन झाले होते. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्य काही आठवणी जागवूयात.

रमेश भाटकर
रमेश भाटकर
author img

By

Published : Feb 4, 2022, 1:09 PM IST

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा आज तिसरा स्मृतिदिन आहे. कर्करोगाच्या आजाराने त्यांचे ७० व्या वर्षी निधन झाले होते. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्य काही आठवणी जागवूयात.

रुपेरी पडदा गाजवणारे भाटकर

3 ऑक्टोबर 1949 साली जन्मलेल्या भाटकर यांनी 1977 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'चांदोबा चांदोबा भागलास का' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' अशा असंख्य चित्रपटात त्यांनी काम केलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. या चित्रपटात रमेश भाटकरांनी मुख्य भूमिका साकारली. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती.

रंगभूमीवरील रमेश भाटकर

रंगभूमीवर त्यांची अनेक नाटके गाजली. 'अखेरीस तू येशीलच', 'केव्हातरी पहाटे', 'मुक्ता' ही त्यांची विशेष गाजलेली नाटकं होती. १९७५ साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात भाटकरांनी 'लाल्या'ची भूमिका एकदम कडक केली होती.

दूरदर्शनवर रमेश भाटकरांचा दरारा

दूरदर्शनवर रमेश भाटकरांची 'हॅलो इन्स्पेक्टर' ही मालिका तुफान गाजली. भाटकर यांचा भारदस्त आवाज आणि त्यांचे ताठ मानेने चालणे या दोन गोष्टींचा दरारा त्यांच्या भूमिकेत सतत जाणवत राहत असे. ‘डीडी टू’वरील तिसरा डोळा या मालिकेमधील गुप्तहेराच्या भूमिकेसाठी रमेश भाटकर आजही ओळखले जातात.

'जीवनगौरव’ने सन्मान​

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आरोपातून मुक्तता

2007 मध्ये त्यांच्यावर एका तरुणीने कास्टिंग काऊच केल्याचा आरोप केला होता. या घटनेने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. माझी बायको जज आहे त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता कुठेही करू नको अन्यथा पोलिसात तक्रार करू अशी धमकी भाटकर यांनी दिल्याचा आरोप या तरुणीने लावला होता. 2010 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणातून भाटकर यांची सुटका केली होती.

हेही वाचा - Gangubai Kathiawadi Trailer : 'गंगूबाई काठीयावाडी'चा डोळे दिपवणारा धमाकेदार ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.