ETV Bharat / sitara

वरुण धवन ‘हिच्याकडून’ घेतो बेस्ट टीव्ही शो आणि चित्रपटांबद्दल ज्ञान! - अनन्या पांडे ही नवीन काळातील यशस्वी स्टार

वरुण धवनला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आणि जेव्हा त्याला काहीतरी ‘चांगले’ बघून वेळ सत्कारणी लावायचा असतो, तेव्हा त्याला आठवण येते त्याच्या फिल्मी मैत्रिणीची म्हणजेच अनन्या पांडेची. ती त्याला ‘नेमका’ सल्ला देते आणि तिने शिफारस केलेले सर्वकाही अप्रतिम आढळल्यामुळे तो तिला ‘परी’ (एंजल) म्हणतो.

वरुण धवन
Varun Dhawan
author img

By

Published : May 31, 2021, 8:03 PM IST

गेल्या दीडेक वर्षांपासून लोकांना, यात सेलिब्रिटीजसुद्धा मोडतात, घरी बसण्याची सवय झालीय. लॉकडाउन्सची उघडझाप होत असताना अनेकांना घरातच मनोरंजनाची भूक भागवावी लागत आहे. सध्या चित्रपटगृहे संपूर्णतः बंद आहेत त्यामुळेच टेलिव्हिजन वा मोबाईलवर अनेक कार्यक्रम बघितले जातात. त्यातच छोट्या पडद्यावरील अनेक चॅनेल्स आणि उपलब्ध असलेले भरमसाठ ओटीटी प्लॅटफॉर्म्स यामुळे चांगलं काय व कुठे बघायला मिळेल हा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो. फिल्म कलाकारांनासुद्धा हा प्रश्न सतावतो आणि मग मित्र-मैत्रिणी, नातेवाईक वा ओळखीच्यांकडे विचारपूस केली जाते. त्यामुळे अनेक नशीबवान लोकांना अनेकदा ‘ज्ञानी’ लोकांमुळे उत्तम ‘कन्टेन्ट’ बघायला मिळतो. या नशीबवान लोकांत नंबर लागतो तरुण सुपरस्टार वरुण धवन याचा आणि त्याला बेस्ट टीव्ही शो आणि चित्रपटांबद्दल माहिती देणाऱ्या ‘ज्ञानी’ अनन्या पांडेचा.

Ananya Pandey'
अनन्या पांडे

‘लायगर’ चित्रपटाची हिरॉईन, जिचा नायक आहे साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा, अनन्या पांडेला देशी विदेशी चित्रपट व शोज बघायला आवडतात आणि त्यातील चांगला ‘कन्टेन्ट’ असलेला चित्रपट वा शोबद्दल ती तिच्या स्नेह्यांना आवर्जून सांगते. वरुण धवनला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आणि जेव्हा त्याला काहीतरी ‘चांगले’ बघून वेळ सत्कारणी लावायचा असतो, तेव्हा त्याला आठवण येते त्याच्या फिल्मी मैत्रिणीची म्हणजेच अनन्या पांडेची. ती त्याला ‘नेमका’ सल्ला देते आणि तिने शिफारस केलेले सर्वकाही अप्रतिम आढळल्यामुळे तो तिला ‘परी’ (एंजल) म्हणून संबोधितो. वरुण धवन ने नुकतेच इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन केले होते ज्यात त्याला विचारण्यात आले होते की उत्कृष्ट चित्रपट/शो बद्दल त्याला कोण शिफारशी देतो. त्यावर त्याने ताबडतोब ‘अनन्या पांडे’ असे उत्तर दिले. या प्रश्नाचे उत्तर देताना वरुणने दोघांचे एक मनमोहक चित्र शेअर केले आणि लिहिले, "What an 👼🏻", आणि दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांनी 'ला..ला..’ करत खुषी व्यक्त केली.

Varun Dhawan
वरुण धवनची पोस्ट
अनन्या पांडे ही नवीन काळातील यशस्वी स्टार असून ती समाज माध्यमांवर आपल्या फॅशन बद्दलच्या आणि विनोदी पोस्ट्सने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आणि आता वरुण धवनने आपल्या चित्रपट आणि टीव्ही शोच्या शिफारशींसाठी केलेल्या स्तुतीमुळे भारावली आहे. अनन्या पांडे आगामी पॅन-इंडिया फिल्म 'लाइगर' मध्ये दिसणार आहे, तसेच सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोण यांच्यासमवेत दिग्दर्शक शकून बत्राच्या चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.