मुंबई - अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'कुली नंबर १' चित्रपटाच्या रिमेकमध्ये व्यग्र आहे. त्याचा 'स्ट्रिट डान्सर' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुण धवन त्याच्या मस्तीखोर अंदाजामुळेही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने त्याच्या जीमट्रेनरसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा मजेशीर डान्स पाहायला मिळतो.
'कुली नंबर वन'च्या शूटिंगदरम्यान त्याने वर्कआऊट करताना एक व्हिडिओ शूट केला. त्याच्या जिमट्रेनरचा वाढदिवस असल्याने दोघांनी एकमेकांसोबत धमाल केली. दोघांनीही 'तुम तो ठेहरे परदेसी' गाण्यावर मजेशीर डान्स केला. हा व्हिडिओ शेअर करुन वरुणने त्याच्या जिमट्रेनरला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -सुशांत सिंग राजपूतच्या ५० स्वप्नांची यादी पाहून रेहा चक्रवर्तीने दिली 'ही' प्रतिक्रिया
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर वरुण धवन आणि सारा अली खानची जोडी कुली नंबर वनच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. याशिवाय 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे.
हेही वाचा - मालदीवच्या समुद्रकिनारी सुष्मिता सेनचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला व्हिडिओ
सध्या 'कुली नंबर वन'चं शूटिंग बँकॉक येथे सुरू आहे. यामध्ये त्याच्यासोबत परेश रावल, जॉनी लिव्हर, राजपाल यादव आणि रजत रावल हे कलाकार देखील झळकणार आहेत. वरुणचे वडील दिग्दर्शक डेव्हिड धवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -आयुष्मानवर बॉलिवूड कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव, 'अशा' दिल्या शुभेच्छा