मुंबई - देशभक्तीवर आधारित गाण्यांमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. या गाण्यातून देशप्रेम तर व्यक्त होतेच, त्याबरोबर देशाप्रती आदरही व्यक्त केला जातो. आता हेच गाणे नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अभिनेता अर्जुन कपूरच्या 'इंडियाज मोस्ट वान्टेड' या चित्रपटात हे गाणे पाहायला मिळणार आहे.
![Vande Mataram Song from Indias most wanted release](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3276775_arjun.jpg)
'वंदे मातरम' या गाण्याला अमित त्रिवेदी यांनी कंपोज केले आहे. तर पॅपोन, अल्तमश फरीदी यांनी हे गाणं गायले आहे. कोरसमध्ये राजीव सुंदरेसन, अर्जुन कामत आणि सुहास सावंत यांनी आवाज दिला आहे. तर, अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
'इंडियाज मोस्ट वान्टेड' या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटात दहशतवाद्याला पकडण्यासाठी पाच जण कशाप्रकारे प्रयत्न करतात, हे दाखविण्यात येणार आहे. २४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पी.एम.मोदी आणि इशा गुप्ताचा 'वन डे' हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या तिनही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर शर्यत पाहायला मिळेल.