मुंबई - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयासोबतच डान्ससाठी लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच त्याचा म्युझिक व्हिडिओ लॉन्च करण्यात आला आहे. या व्हिडिओची सध्या प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पार्टी थिमवर आधारित '8 pm' या गाण्यावर टायगरचा धमाल डान्स पाहायला मिळतो. या गाण्याची कोरिओग्राफी रेमो डिसुजाने केली आहे. बेनी दयालने हे गाणं गायलं आहे. सचिन- जिगर या जोडगोळीने या गाण्याला कंपोझ केले आहे.
या गाण्याच्या शूटिंगदरम्यान रेमो डिसुजासोबत खूप चांगला अनुभव आला. रेमोच्या डान्समुव्हची मलाही क्रेझ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे या गाण्यासाठी फार उत्सुक होतो, असे टायगरने एका माध्यमाशी बोलताना सांगितले.
सध्या टायगर 'स्टूडंट ऑफ द ईयर-२' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ह्रतिक रोषनसोबतही तो लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.