ETV Bharat / sitara

अभिनेत्री निक्की गलरानीच्या घरी चोरी करणाऱ्या नोकराला अटक

अभिनेत्री निक्की गिलरानीचा चेन्नईतील रोयापेट भागात एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. 11 जानेवारी रोजी निक्कीने पोलिसात तक्रार दाखल केली की तिच्या नोकराने तिच्या राहत्या घरातून 1.25 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत.

अभिनेत्री निक्की गलरानी
अभिनेत्री निक्की गलरानी
author img

By

Published : Jan 19, 2022, 5:10 PM IST

चेन्नई : अभिनेत्री निक्की गलरानीच्या चेन्नईतील घरात तिच्या नोकराने चोरी केली असून, तो १.२५ लाख रुपयांच्या वस्तू घेऊन पळून गेला आहे. निक्की मूळची कर्नाटकची असून तिने मोट्टा सिवा केट्टा सिवा, एमराल्ड कॉइन आणि डार्लिंग या सारख्या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच या अभिनेत्रीने दिग्दर्शक शशिकुमार यांच्या राजवंशम या चित्रपटातही काम केले आहे.

अभिनेत्री निक्की गिलरानीचा चेन्नईतील रोयापेट भागात एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. 11 जानेवारी रोजी निक्कीने पोलिसात तक्रार दाखल केली की तिच्या नोकराने तिच्या राहत्या घरातून 1.25 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत.

दरम्यान त्याच वेळी व्हीसीके पक्षाचे सदस्य असलेल्या चेल्लादुराई यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली की धनुषला चोरीच्या आरोपाखाली बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आहे आणि याबद्दल अभिनेत्री निक्कीवर कारवाई करण्यात यावी.

दोन्ही तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धनुष ( निक्कीच्या घरातील नोकर ) दोषी असल्याची खात्री करण्यात आली. तो तिरुपूरमध्ये लपून बसल्याचेही त्यांना आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून अभिनेत्री निक्कीचे सामान जप्त केले आहे.

हेही वाचा - बालविवाहातून सुटका करुन सुपरमॉडेल बनलेल्या निशा यादवची 'चित्तरकथा' !!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.