ETV Bharat / sitara

‘टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!

author img

By

Published : Apr 14, 2021, 8:13 PM IST

‘टकाटक’ या मराठी चित्रपटाने २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. ‘टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात झाली आहे.

‘टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरूवात

‘टकाटक’ या मराठी चित्रपटाने २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. अनपेक्षितपणे मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने ‘टकाटक’ ची टीम खुशीत होती. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे त्या चित्रपटाचा सिक्वेल येणे अपेक्षितच होते कारण या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. प्रेक्षकांच्या याच प्रेमाखातर ‘टकाटक २’ च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आता गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक २’ च्या शूटिंगचा शुभारंभही करण्यात आला आहे.

shooting of the sequel of 'Takatak' started

​‘टकाटक २’ ची संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड यांनी कथानाकाला पोषक असं संवादलेखन केलं आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली बनवणा-या ‘टकाटक २’ ची निर्मिती ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम करीत असून सहनिर्माते आहेत जगत सिंग. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईवर आधारित असलेलं कथानक पहायला मिळणार असलं तरी सर्वच वयोगटातील रसिकांसाठी यात एक जबरदस्त मेसेज दडलेला असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. ‘टकाटक’ या चित्रपटाप्रमाणेच ‘टकाटक २’ च्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने संपूर्ण टीमला एक वेगळाच हुरूप आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मराठी सिनेसृष्टी आणि मराठी रसिकांसाठी ही एक गोड आणि सुखद बातमीच आहे. मोशन पोस्टरला मिळालेल्या यशाचा आनंद सेलिब्रेट करीत चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.​जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीत दिग्दर्शन वरूण लिखते यांनी केलं आहे. निलेश गुंडाळे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असून या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणा-या कॅमेरामन हजरत शेख वली यांच्या नजरेतून नयनरम्य लोकेशन्समधील निसर्गसौंदर्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. ‘टकाटक २’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती देण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. रसिकांनी जसं ‘टकाटक’वर भरभरून प्रेम केलं तसेच ‘टकाटक २’ वरही करावं आणि ते करतीलही अशी आशाही कवडे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - हिऱ्यांची अंगठी पाहून चाहत्यांनी मलाइकाला विचारले, ''अर्जुनसोबत एंगेजमेंट झाली का?''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.