मुंबई - उत्तम आशय आणि दमदार अभिनयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. आता अशाच एका अनोख्या विषयावरील 'अदृष्य' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. कबीर लाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कलात्मक फोटोग्राफीसाठी त्यांनी आजवर केलेली मेहनत प्रेक्षकांनी पाहिली आहे. त्यांची ही कलात्मक नजर आता मराठी पडद्यावर कोणती जादू करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
कबीर लाल यांची खरी ओळख डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी अशी आहे. त्यांनी आजवर 'ताल', 'परदेस' आणि 'कहो ना प्यार है' यासारख्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे छायांकन केले आहे. 'अदृष्य' या मराठी चित्रपटातून कबीर लाल दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत. आता एका वेगळ्या विषयावरचा 'अदृष्य' हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
'अदृष्य' या चित्रपटात अभिनेत्री मंजीरी फडणीस, पुष्कर जोग, अनंत जोग, उषा नाडकर्णी आणि अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका असतील. 'अदष्य' या चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला असून येत्या १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - Prakash Raj Birthday: सडेतोड भाष्य करणारा अष्टपैलू अभिनेता प्रकाश राज