मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला 'थप्पड' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
'थप्पड'च्या ट्रेलरमध्येच तापसीच्या अभिनयाची दमदार झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे या चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज निर्मात्यांनी व्यक्त केला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३ कोटींची कमाई करत ओपनिंग केली आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडेल, असा अंदाज समीक्षकांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -Public Review : समाजाच्या दुटप्पीपणावर तापसीची जोरदार 'थप्पड़'
'थप्पड' हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. एखाद्या नात्यात बंदिस्त झाल्यावर एका चापटीमुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे बदलते याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तापसीसोबत यामध्ये रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">