मुंबई - मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने यंदाची नवरात्री अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. दरदिवशी देवीच्या विविध रुपातून तिने समाजातील गंभीर विषयांवर भाष्य करत आपल्या पोस्ट शेअर केल्या आहे. तिने शेअर केलेल्या या अनोख्या फोटोंचं नेटकरीही कौतुक करत आहेत.
तेजस्विनीने आत्तापर्यंत कोल्हापूरचा पूर, नैसर्गिक आपत्ती, ध्वनी प्रदूषण, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, व्यसन, पर्यावणाराचा ऱ्हास, आरे परिसरातील वृक्षतोड यांसारख्या विषयावर प्रकाश टाकत आपली व्यथा मांडली आहे.
हेही वाचा -'आज त्यांचा प्रवास संपवला, कालांतराने तुमचाही....', 'आरे' वृक्षतोडीवर तेजस्विनीने मांडली व्यथा
सुरुवातीला कोल्हापूरची अंबाबाई, द्वितीय कामाख्या, तृतीय जरीमरी आई, चतुर्थी महालक्ष्मी, पंचमी शेरावाली माता, षष्ठी तुळजाभवानी, सप्तमी मुंबादेवी, अष्टमी गावदेवी, अशी रुपं तेजस्विनीने धारण केली आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'तेजाज्ञा' करणार तुमचा नखशिखान्त मेकओवर