ETV Bharat / sitara

'तेजाज्ञा' करणार तुमचा नखशिखान्त मेकओवर - Tejaswini Pandit latest news

5 आणि 6 ऑक्टोबरला ठाण्यात होणाऱ्या ‘तेजाज्ञा’ एक्सिबिशनमध्ये याची सुरूवात होणार आहे. यामध्ये विविध डिझाईन्सची कपडे तर मिळतीलच पण तुमचा मेकओव्हर करण्यासाठी स्टायलिस्टही असतील.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे
author img

By

Published : Oct 5, 2019, 4:09 PM IST

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे आपल्या तेजाज्ञा ब्रँडव्दारे खूप वेगवेगळं कलेक्शन दरवेळी घेऊन येतात. आता नवरात्र-दसरा-दिवाळीच्या सुमारास तर तेजाज्ञाव्दारे त्या तुमचा संपूर्ण मेकओव्हरही करून देणार आहेत.

5 आणि 6 ऑक्टोबरला ठाण्यात होणाऱ्या ‘तेजाज्ञा’ एक्सिबिशनमध्ये याची सुरूवात होणार आहे. याविषयी अभिनेत्री आणि डिझाइनर अभिज्ञा भावे म्हणते, “तेजाज्ञाच्या ठाण्याच्या एक्सिबिशनला तुम्ही भेट दिली तर हा तुमचा मेकओव्हर होऊ शकेल. एक्सिबिशनमध्ये खास स्टाइलिस्ट असतील जे तुमचा येत्या सणासुदीच्या काळासाठी तुमचा मेकओव्हर करतीलच. पण एक्सिबिशनमध्ये मेन्स-वुमन्स कलेक्शनव्दारे संपूर्ण कुटूंबासाठी तुम्ही शॉपिंग करू शकता आणि तुमचा फेस्टिव सिझनमध्ये नखशिखान्त मेकओव्हर होऊ शकतो. ”

अभिनेत्री आणि डिझाइनर तेजस्विनी पंडित सांगते, “मागच्या एक्सिबिशनला आम्ही गोल्डन दागिना कलेक्शन लाँच केल्यावर आता नवरात्रीसाठी सिल्व्हर दागिना कलेक्शन घेऊन आलो आहोत. तसेच सिल्व्हर ज्वेलरीचेही नाकाच्या नथीपासून ते पायातल्या जोडवीपर्यंत आम्ही भरपूर कलेक्शन घेऊन आलो आहोत. दसऱ्यासाठी खास पदरावर सरस्वतीचे डिझाइन असलेल्या साड्या आहेत. तर खण पैठणीच्या सहावार साड्याही दिवाळीसाठी आणल्या आहेत. रोजच्या वापरासाठी वेस्टर्न आउटफिट आणि पुरूषांसाठीचे खास कुर्ता कलेक्शनही आम्ही घेऊन आलो आहोत. एवढंच नाही, तर वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स, पर्सेस असे बरेच काही तुम्ही सणासुदीसाठी खरेदी करू शकता.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.