ETV Bharat / sitara

बहुप्रतिक्षीत ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला - teaser of Sarsenapati Hambirrao movie

दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या 'सरसेनापती हंबीरराव' च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

सरसेनापती हंबीरराव
सरसेनापती हंबीरराव
author img

By

Published : Dec 21, 2021, 6:58 PM IST

मुंबई - कोरोनाच्या दोन लाटांनंतर मराठी चित्रपटसृष्टी आता पूर्वपदावर येत आहे. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरू झाले आहेत. मराठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पहात असलेल्या आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्याची क्षमता असलेल्या लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे त्यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या 'सरसेनापती हंबीरराव' च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे. या टीझर मधून चित्रपटाची भव्यता तर लक्षात येतेच पण चित्रपटातील संवाद आणि ऍक्शन सिक्वेन्स जबरदस्त लक्षवेधी असणार आहेत याचाही अंदाज येतो.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. मराठीतील हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे उघड झाले होते. तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? या प्रश्नाचे उत्तर टीझर मध्ये मिळाले असून मुख्य भूमिकेत दमदार अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे दिसणार आहेत.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हेही वाचा - Pawankhind Teaser Out : बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा सांगणारा 'पावनखिंड'चा टीझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.