मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ या क्रीडा चित्रपटात अॅथलिटची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तापसीला पूर्णपणे अॅथलिटसारखे दिसण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच ती सध्या संतुलित आहार घेत आहे. तिच्या सकाळच्या जेवणाचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करुन तिने ही माहिती दिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “रश्मी रॉकेट” ची तयारी करताना चांगले वाटत आहे. मी माझ्या दिवसाची सुरुवात न्याहारीत बऱ्याच कार्बोहायड्रेटसह करत आहे. आहारतज्ज्ञ मुनमुन गेनिरवाल यांनी सांगितले आहे की अॅथलिट शरीर तयार करण्यासाठी फक्त प्रथिने पुरेसे नाहीत, परंतु योग्य संतुलन राखणे महत्वाचे आहे. माझ्या प्लेटमध्ये गोड बटाटे असतात, उच्च-कार्बोहायड्रेट खाण्याची शिफारस मुनमुनने केली आहे आणि मी त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे ते खाण्याची शिफारस करते! "
अभिनेत्री तापसी पन्नू नोव्हेंबरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
या चित्रपटामध्ये तिच्या लूकचा फोटो शेअर करत या अभिनेत्रीने लिहिले आहे की, "मी बऱ्याच दिवसांनी पुन्हा रुळावर परत येत आहे. या नोव्हेंबरमध्ये रश्मी रॉकेटचे शूटिंग चालू होईल."
आकाश खुराना दिग्दर्शित हा चित्रपट कच्छच्या रणातील एका धावपटूवर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता प्रियांशु पेन्नुली तापसीच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे.