ETV Bharat / sitara

गाजलेल्या 'या' दिग्दर्शकाने काळाची पावले ओळखून सुरू केले किराणा दुकान - दिग्दर्शकाने सुरू केले किराणा दुकान

तमिळ फिल्म इंडस्ट्रीत १० वर्षांहून अधिक काळ राहिल्यानंतर, चित्रपट निर्माता आनंदने महामारीच्या काळात आपल्या उपजिवीकेसाठी किराणा दुकान सुरू केले आहे. देशातील चित्रपटगृहे पुढच्या वर्षापर्यंत बंद राहतील याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हा मार्ग निवडला आहे.

Tamil filmmaker opens grocery store
दिग्दर्शकाने सुरू केले किराणा दुकान
author img

By

Published : Jul 4, 2020, 2:55 PM IST

चेन्नई: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे फिल्म व्यवसायात अडथळा निर्माण झाला आहे. चेन्नईतील चित्रपट दिग्दर्शक आनंदने साथीच्या आजाराच्या वेळी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किराणा दुकान सुरू केले आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीत १० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या आनंद यांना पुढच्या वर्षापर्यंत देशातील चित्रपटगृहे बंद राहतील याची जाणीव झाली. त्यानंतर उपजिवीकेसाठी त्यांनी हा मार्ग शोधलाय.

बचतीचा उपयोग करून, दिग्दर्शकाने त्याच्या जवळच्या मित्राकडून इमारत भाड्याने घेतली आणि चेन्नईच्या मॉलीवाक्कममध्ये किराणा दुकान सुरू केले आहे

“लॉकडाऊन कालावधीत, मी फक्त माझ्या घरातच बंदिस्त होतो. जेव्हा मला कळले की तमिळनाडूमध्ये फक्त किराणा आणि प्रोव्हिजनल स्टोअर्स उघडली गेली आहेत, तेव्हा मी एक दुकान उघडण्याचे ठरविले,” असे आनंद म्हणाले.

" जास्त खरेदीदार मिळालेत यासाठी तेल, डाळी, तांदूळ यासह सर्व उत्पादने मी कमी किंमतीत विकत घेतो आणि याचा मला आनंद आहे," असे ते पुढे म्हणाले.

फिल्म निर्माण सोडून किराणा दुकान सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता, दिग्दर्शक म्हणाले, "यावर्षी फिल्म इंडस्ट्रीचे अनलॉक करण्याचे भविष्य मला दिसत नाही कारण सर्वप्रथम लोकांची भीती दूर व्हावी लागेल."

“मॉल्स, पार्क्स आणि समुद्रकिनारे उघडल्यानंतरच चित्रपटगृहे उघडतील. त्यानंतर आमच्याकडे फक्त एक करिअर आहे, तोपर्यंत मी येथे माझ्या किराणा दुकानात असणार आहे,” ते पुढे म्हणाले.

हेही वाचा - #ब्रेक द साइलेन्स फॉर सुशांत : सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी ट्विटर ट्रेंड

ओरू माझाई नानगु सरल, आणि मौना मझाई आणि इतर सारख्या कमी बजेटमधील चित्रपटांची उत्तम निर्मिती करण्याबद्दल आनंद यांची ओळख आहे.

त्यांचा शेवटचा चित्रपट 'थुंनिथु से' हा अंतिम टप्प्यात आला असून त्याची निर्मिती पूर्ण झाली असून आता फक्त दोन गाणी बाकी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.