ETV Bharat / sitara

फोटोमुळे ट्रोल झाली ताहिरा कश्यप, फोटो डिलिट करुन मागितली माफी - trolling

ताहिराने काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरवर मात केली आहे. कॅन्सरवर यशस्वी मात करून तिने तिच्या कामालाही सुरुवात केली आहे.

'या' फोटमुळे ट्रोल झाली ताहिरा कश्यप, फोटो डिलीट करुन मागितली माफी
author img

By

Published : Jun 20, 2019, 9:54 AM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप अलिकडेच एका फोटोमुळे चर्चेत आली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यामुळे तिने तो फोटो डिलिट करून चाहत्यांची माफी मागितली आहे.

ताहिरा सध्या तिच्या मुलांसोबत कामातून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने गौतम बुद्धांच्या पुतळ्यावर बसुन फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे तिला नेटक्यांनी धारेवर धरले. तिला बऱ्याच टीकांना सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर तिने नंतर तो फोटो काढून टाकला.

'कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण माझ्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी माफी मागते', असे लिहून ताहिराने एक पोस्ट शेअर केली आहे.

ताहिराने काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरवर मात केली आहे. कॅन्सरवर यशस्वी मात करून तिने तिच्या कामालाही सुरुवात केली आहे. आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्तीसोबत तिने एका व्हिडिओ अल्बमची निर्मिती केली आहे. या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.