ETV Bharat / sitara

'बस इतनी सी बात?', विचार करायला भाग पाडेल तापसीच्या 'थप्पड'चा ट्रेलर - Taapsi Pannu latest news

'थप्पड' हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आधारित आहे.

Thappad Trailer, Taapsi Pannu in Thappad, Thappad film release date, 'थप्पड'चा ट्रेलर , Taapsi Pannu latest news, Taapsi Pannu upcoming film
'बस इतनी सी बात?', विचार करायला भाग पाडेल तापसीच्या 'थप्पड'चा ट्रेलर
author img

By

Published : Jan 31, 2020, 2:05 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नुच्या 'थप्पड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसीच्या अभिनयाची दमदार झलक पाहायला मिळते. 'बस इतनी सी बात?' हा महिलांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारा प्रश्न प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा असा आहे.

'थप्पड' हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. एखाद्या नात्यात बंदिस्त झाल्यावर एका चापटीमुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे बदलते याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटना नेहमी आपल्या जवळपास घडत असतात. एखाद्या कारणावरून स्त्रियांवर हात उचलणे, तिला मारहाण करणे या गोष्टी सहज घडतात. मात्र, त्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. समाजाच्या भीतीमुळे किंवा नातं टिकवून ठेवण्यासाठी अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात. पण एक थप्पडही तो मारू शकत नाही, तशी मारण्याचा त्याला काही अधिकार पोहोचत नाही, हेच या ट्रेलरमधून दाखवण्यात आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तापसीसोबत यामध्ये रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

'बस इतनी सी बात?', विचार करायला भाग पाडेल तापसीच्या 'थप्पड'चा ट्रेलर

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नुच्या 'थप्पड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसीच्या अभिनयाची दमदार झलक पाहायला मिळते. 'बस इतनी सी बात?' हा महिलांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारा प्रश्न प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा असा आहे.

'थप्पड' हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. एखाद्या नात्यात बंदिस्त झाल्यावर एका चापटीमुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे बदलते याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटना नेहमी आपल्या जवळपास घडत असतात. एखाद्या कारणावरून स्त्रियांवर हात उचलने, तिला मारहाण करणे या गोष्टी सहज घडतात. मात्र, त्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. समाजाच्या भीतीमुळे किंवा नातं टिकवून ठेवण्यासाठी अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात. पण, एक चापट देखील तो मारू शकत नाही, हेच या ट्रेलरमधुन दाखवण्यात आले आहे.

अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तापसीसोबत यामध्ये रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.