कोलकाता: सुशांतसिंग राजपूत अभिनीत दिल बेचार या चित्रपटात बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिने काम केले आहे. सोशल मीडियावरन तिने सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय.
सोशल मीडियात जाताना तिने एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सुशांत आणि स्वस्तिका एकत्र बॉलिवूडच्या जुन्या हिट गाण्यावर थिरकताना दिसतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ शेअर कताना तिने लिहिलंय, ''त्याने किझीसोबत डान्स केला आणि नंतर त्याने माझ्यासोबतही डान्स केला...मला या प्रकारे त्याला आठवणीत ठेवायचे आहे.''
हेही वाचा - आई आयसोलेशनमध्ये तर भावाचे कुटुंबीय होम क्वारंटाईनमध्ये - अनुपम खेर
चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचे आभार मानत स्वास्तिका पुढे म्हणाली की, या आठवणींना तिला कायमचे जपायचे आहे.
तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया देऊन लाईक केले आहे.