मुंबई - गणेशोत्सवानिमित्त बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री स्वरा भास्कर देखील गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. मात्र, दर्शन घेतल्यानंतर परत येताना तिला अनवाणी पायानंच परतावं लागलं. कारण, तिची चप्पल यावेळी चोरीला गेली. याची माहिती खुद्द स्वरानेच सोशल मीडियावर शेअर केली.
दर्शनाला जाण्यापूर्वी स्वराने काही फोटो शेअर केले होते. यामध्ये तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल देखील पाहायला मिळते. मात्र, दर्शन घेऊन आल्यानंतर तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला. 'दर्शनाला गेल्यानंतर चप्पल चोरीला गेली नाही, तर काय दर्शन घडलं', असं मजेदार कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिलं आहे.
-
Because what’s a Darshan to Mumbai’s iconic #lalbaughcharaja if you don’t lose your shoes? 🤣🤣🤣 #sachcheybhakt pic.twitter.com/CDDYS0FP88
— Swara Bhasker (@ReallySwara) September 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Because what’s a Darshan to Mumbai’s iconic #lalbaughcharaja if you don’t lose your shoes? 🤣🤣🤣 #sachcheybhakt pic.twitter.com/CDDYS0FP88
— Swara Bhasker (@ReallySwara) September 11, 2019Because what’s a Darshan to Mumbai’s iconic #lalbaughcharaja if you don’t lose your shoes? 🤣🤣🤣 #sachcheybhakt pic.twitter.com/CDDYS0FP88
— Swara Bhasker (@ReallySwara) September 11, 2019
हेही वाचा-'बागी ३' च्या शूटिंगला सुरुवात, टीमने शेअर केले फोटो
बऱ्याचदा मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर चप्पल चोरीचा प्रकार घडत असतो. सर्वसामान्यांला बऱ्याचदा हा अनुभव येत असतो. मात्र, स्वरा भास्करबाबतही हे घडल्यामुळे तिच्यासाठी हा पहिल्यांदाच आलेला अनुभव होता. स्वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे स्वराला ट्रोलही करण्यात येत आहे.
-
Made it to the mighty #LalbaugchaRaja 🙏🏿🙏🏿🙏🏿 #blessed pic.twitter.com/uD6q98l2NH
— Swara Bhasker (@ReallySwara) September 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Made it to the mighty #LalbaugchaRaja 🙏🏿🙏🏿🙏🏿 #blessed pic.twitter.com/uD6q98l2NH
— Swara Bhasker (@ReallySwara) September 11, 2019Made it to the mighty #LalbaugchaRaja 🙏🏿🙏🏿🙏🏿 #blessed pic.twitter.com/uD6q98l2NH
— Swara Bhasker (@ReallySwara) September 11, 2019
हेही वाचा-'स्वत:ची शैली निर्माण कर' असं सांगणाऱ्या लतादिदींना राणू मंडलने दिलं उत्तर