ETV Bharat / sitara

सामाजिक बांधिलकी जपत स्वप्नील जोशीचा महिला सक्षमीकरण उपक्रम, ‘आत्मसन्मान’! - स्वप्नील जोशीचा महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार

अभिनेता स्वप्नील जोशीने जागतिक महिला दिनी तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांच्यासोबत महिला सक्षमीकरण आणि ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेवर आधारित ‘आत्मसन्मान’ हा एक उपक्रम सुरु केलाय. गरजू महिलांना व्यापार-उदिमाची आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी देणारे आत्मसन्मान हे व्यासपीठ असून महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे उद्दिष्ट आहे.

Atmasanman
आत्मसन्मान
author img

By

Published : Mar 9, 2021, 5:45 PM IST

मुंबई -मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी अभिनयाव्यतिरीक्त सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असतो. जागतिक महिला दिनी त्याने तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांच्यासोबत महिला सक्षमीकरण आणि ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेवर आधारित ‘आत्मसन्मान’ हा एक उपक्रम सुरु केलाय. गरजू महिलांना व्यापार-उदिमाची आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी देणारे आत्मसन्मान हे व्यासपीठ असून महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या महिलांना स्वतःची उत्पादने विकायची आहेत किंवा व्यापार करायचा आहे त्यांच्यासाठी हे एक आदर्श ऑनलाईन पणन व्यासपीठ आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे भागभांडवल नाही, त्यांना ते मिळवून देण्याची जबाबदारीसुद्धा ‘आत्मसन्मान’ घेते. महिलांचे उत्पादन असेल तर त्यांची दर्जा तपासणी करणे, त्यांची छायाचित्रे काढून ती वेबवेबसाईटवर टाकणे, आवश्यक ते इंटरनेट तसेच भाषाज्ञान महिलांना देणे, हे सर्व काम ‘आत्मसन्मान’तर्फे केले जाते.

Atmasanman
स्वप्नील जोशीचा महिला सक्षमीकरण उपक्रम, ‘आत्मसन्मान’
‘इम्परेटीव्ह बिझनेस व्हेंचर्स’च्या संस्थापिका मंजुषा पैठणकर या उपक्रमामध्ये जोडल्या गेल्याने ‘शॉप विथ ती’चा ‘आत्मसन्मान’च्या माध्यमातून विस्तार झाला असून महिलांना त्यांच्या संकल्पना, कठोर मेहनत आणि जिद्द केवळ याच भांडवलावर व्यापार उदीम करण्याची आणि त्याद्वारे उद्योजक होण्याची अनोखी संधी देणारा हा उपक्रम आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या ‘आत्मसन्मान’ हे बहुविक्रेता आणि बहुव्यापार इ-कॉमर्स व्यासपीठ असून त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा येथील महिलांना अनोखी अशी संधी प्राप्त होणार आहे.या उपक्रमाबद्दल बोलताना स्वप्निल जोशी म्हणाला, “माझ्या महिला-चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकलो आहे. तृप्ती आणि मी ‘शॉप विथ ती’ची एकत्रित स्थापना केली कारण आम्हा दोघांचे ध्येय आणि मूल्ये एक होती. ‘शॉप विथ ती’ हा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. उभरते उद्योजक आणि त्यांच्या उध्यमशील कौशल्याचा उपयोग समाजाला मोठ्या प्रमाणवर होतो. जेव्हा हे उद्योजक महिला असतात तेव्हा त्यांचा समाजाला होणारा फायदा हा अधिक मोठा असतो. आणि आता त्यांना साथ द्यायला ‘आत्मसन्मान’ आहे.” ‘इम्परेटीव्ह बिझनेस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ च्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालक मंजुषा पैठणकर म्हणाल्या, “समाजातील आणि सर्वच स्तरांमधील महिला आपले कुटुंब आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आल्या आहेत आणि प्रत्येकीतच उद्यमशिलतेचे एक अंग लपलेले असते. त्यांच्या या उद्यमशिलतेला एक हक्काचे व सन्मानाचे व्यासपीठ असावे असा विचार मनात आला आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे उद्दिष्ट असलेल्या ‘आत्मसन्मान’ या ई-कॉमर्स पोर्टलची निर्मिती झाली.”संपूर्ण पारदर्शी कारभार असलेल्या उपक्रमाचा भाग होण्यासाठी उद्योजक महिलांनी त्यांची केवायसी कागदपत्रे, उद्योग आधार, जीएसटी क्रमांक, एफएसएसएआय परवाना आणि उत्पादनाशी संबंधित इतर गोष्टी या उपक्रम व्यवस्थापनाला पुरविणे गरजेचे आहे. हेही वाचा - श्रध्दा कपूरने 'सायना' चित्रपट का सोडला? या प्रश्नाला अमोल गुप्तेने दिली बगल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.