ETV Bharat / sitara

'तू माझ्या आयुष्यात आलीस अन्...', पत्नीच्या वाढदिवशी स्वप्नील जोशीच्या खास शुभेच्छा - स्वप्नील जोशी

सोशल मीडियावर आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो स्वप्नीलने शेअर केले आहे. या फोटोवर त्याने दिलेलं कॅप्शनही खास आहे.

'तू माझ्या आयुष्यात आलीस अन्...', पत्नीच्या वाढदिवशी स्वप्नील जोशीच्या खास शुभेच्छा
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:04 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे. लिना जोशी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. स्वप्नीलने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये रोमॅन्टिक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या पत्नीसाठीही त्याने त्याच्या रोमॅन्टिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे.

सोशल मीडियावर आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो स्वप्नीलने शेअर केले आहेत. या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शनही खास आहे. 'एकेदिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आजपर्यंत तू सर्वांना एकत्र जोडून ठेवलंस', असं लिहुन त्याने तिचे आभारही मानले आहेत.

  • One day, you came into My Life..To today...where u made all of us, Your Life. Thank U for being u! Happy b'day @JoshiLeena ! Khoop prem! pic.twitter.com/QA4ueczznn

    — Swapnil Joshi || स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा- 'हिरकणी'च्या भूमिकेसाठी सोनालीची 'अशी' झाली निवड

स्वप्नील जोशी काही दिवसांपूर्वीच 'मोगरा फुलला' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

त्याने 'तुहीरे', 'मितवा', 'दुनियादारी', मुंबई - पुणे - मुंबई', 'मंगलाष्टका - वन्स मोअर' यांसारखे दर्जेदार चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. चाहत्यांमध्येही त्याची क्रेझ पाहायला मिळते. छोट्या पडद्यावरीलही 'जिवलगा' या मालिकेत त्याने भूमिका साकारली होती.

हेही वाचा -मुंबई पोलिसांनी खास अंदाजात केलं अमिताभ बच्चन यांचं अभिनंदन, पाहा ट्विट

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.