ETV Bharat / sitara

#bottlecapchallenge: बॉलिवूडकरांना मागे टाकत मराठी कलाकारांनीही स्वीकारलं चॅलेंज, पाहा मजेशीर व्हिडिओ - bottle cap challenge

अभिनेता स्वप्नील जोशी, श्रेअस तळपदे आणि अमृता खानविलकर यांनी हे बॉटल कॅप चॅलेंज स्वीकारले आहे.

#bottlecapchallenge: बॉलिवूडकरांना मागे टाकत मराठी कलाकारांनीही स्विकारलं चॅलेंज, पाहा मजेशीर व्हिडिओ
author img

By

Published : Jul 6, 2019, 12:41 PM IST

Updated : Jul 6, 2019, 1:02 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर सध्या 'बॉटल कॅप चॅलेज' ट्रेण्ड मध्ये आहे. #bottlecapchallenge असा हॅशटॅग वापरून बरेचजण हे आव्हान साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर तर हे चॅलेंज जास्तच प्रसिद्धी झोतात आले आहे. अक्षयनंतर टायगर श्रॉफ, सुष्मिता सेन, रोहमन शॉल, सुनील ग्रोव्हर, कुणाल खेमु यांनीदेखील आपल्या आपल्या अंदाजात हे चॅलेंज स्वीकारून पूर्ण केले. मग, यात मराठी कलाकार कसे मागे राहतील. मराठी कलाकारांनीही हे चॅलेज स्वीकारले आहे. त्याचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशी, श्रेअस तळपदे आणि अमृता खानविलकर यांनी हे बॉटल कॅप चॅलेंज स्वीकारले आहे. या स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो चॅलेंज पूर्ण करत असताना सिद्धार्थ चांदेकर मध्येच येऊन बॉटल उचलून घेऊन जातो. त्यानेदेखील हा व्हिडिओ शेअर करून स्वप्नीलची माफी मागितली आहे.

तर, अमृता खानविलकरने चक्क साडीच्या पदराने बॉटलचे झाकण उघडून हे चॅलेंज पूर्ण केले आहे. सर्व मजा पुरुषांनीच का करायची, असे कॅप्शन देत तिने तिचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता श्रेअस तळपदे यानेही हे चॅलेंज स्विकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातातच बॉटलचे झाकण होते. त्याने या व्हिडिओतून पाणी वाचवण्याचा संदेशही दिला आहे.

एकंदर बॉटल कॅप चॅलेंजचं फिवर सिनेक्षेत्रात चांगलच पसरलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Intro:Body:

ent

Conclusion:
Last Updated : Jul 6, 2019, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.