मुंबई - मराठी चित्रपट त्याच्या आशयघनतेसाठी प्रसिद्ध आहे. अनेक बॉलिवूडकर मराठी चित्रपटांशी जुळताना दिसून येतात. अक्षय कुमार हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव. त्याच्या केप ऑफ गुड फिल्म्स प्रॉडक्शन च्या बॅनरखाली बनलेला ‘चुंबक’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सोनी लिव्हवर होणार आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनाही आवडलेला ‘चुंबक’ नैतिकता व महत्त्वाकांक्षा यामधून एकाची निवड करण्याच्या सातत्यपूर्ण संघर्षाबाबतची कथा सांगतो. यातील भूमिकेसाठी स्वानंद किरकिरे यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
ही आहे चुंबकची कथा
'चुंबक' ही किशोरवयीन रेस्टॉरण्ट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे. तो त्याचे स्वप्न साकारण्यासाठी लोकांची फसवणूक करण्याचे ठरवतो. त्याचा एकमेव बळी ठरलेले प्रसन्न (स्वानंद किरकिरे) यांच्याशी सामना होतो. प्रसन्न हे बौद्धिक अक्षमता असलेले वृद्ध आहेत. त्यानंतर बाळू नैतिकता व स्वप्नांच्या दुविधेमध्ये अडकून जातो. दोघेही एका प्रवासावर निघून जातात, जो त्यांच्या जीवनाला कायमस्वरूपी कलाटणी देतो. बाळू त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी निरागस व्यक्तीची फसवणूक करेल का की त्याचे मन बदलेल?नैतिकता व महत्त्वाकांक्षा यामधून एकाची निवड करण्याच्या सातत्यपूर्ण संघर्षाबाबतची कथा घेऊन येत आहे सोनीलिव्हवरील पुरस्कार-प्राप्त मराठी चित्रपट 'चुंबक'. राष्ट्रीय पुरस्कार-विजेते दिग्दर्शक संदीप मोदी यांचे दिग्दर्शन आणि अक्षय कुमार प्रस्तुत चित्रपट 'चुंबक'मध्ये साहिल जाधव, स्वानंद किरकिरे आणि संगम देसाई प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा - हिमाचल : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा धर्मशाळा येथे एकत्र; चामुंडा देवी, ज्वालाजी मंदिराला दिली भेट