मुंबई - सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांनी त्यांच्या नात्याविषयी कधीही जगापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघांमधील बॉन्डिंग पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी मात्र, दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एवढंच काय तर, त्यांचे ब्रेकअप झाले की काय, अशा देखील चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र, या सर्वांवर सुष्मिताने पूर्णविराम लावला आहे. तिने रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करून त्या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे दाखवून दिले आहे.
रोहमनने इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे त्याचे आणि सुष्मिताचे भांडण झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यांच्या नात्यात दुरावा आला, असेही सर्वांना वाटले. मात्र, त्यानंतर सुष्मिताने शेअर केलेल्या फोटोवर रोहमनची प्रतिक्रिया पाहून दोघांमध्येही सर्वकाही सुरळीत आहे, हे स्पष्ट झाले. आता सुष्मिताच्या फोटोवरूनही यावर शिक्कामोर्बत झाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत तिने अनोख्या अंदाजात रोहमनवरील प्रेमाची कबुली दिली आहे. शिवाय रोहमनची इन्स्टा स्टोरीही असंच काहीसे सांगून जाते. ज्यामध्ये त्याने, 'आपल्या हृदयाला त्याच्या घराची जागा मिळाली आहे आणि ती म्हणजे तू आहेस....' असं म्हणत सुष्मिताला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. त्यामुळे या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात सारंकाही सुरळीत आहे, असेच म्हणावे लागेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">