मुंबई - अभिनेत्री सुश्मिता सेनने एक फोटो शेअर केलाय. यात तिने एक सुंदर अंगठी घातलेली दिसते. यानंतर तिने साखरपुडा केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
सुश्मिता सेन गेली काही दिवस रोहमन शॉल या मित्रासोबत डेटींग करीत असल्याची चर्चा होती. तिच्या इनस्टाग्रामवरील पोस्ट पाहिल्यानंतर याचा प्रत्यय येतो. दोघांचे किती प्रेम आहे हे त्यांच्या फोटोवरुन लक्षात येते. अलिकडचा तिचा फोटो पाहिला की हे नाते आता पुढच्या टप्प्यावर पोहोचल्याचे दिसते.
सुश्मिताने इन्स्टाग्रामवर रोहमनसोबतची सेल्फी शेअर केली आहे. यात ही जोडी खूप सुंदर दिसत आहे. यात सर्वाधिक लक्ष वेधणारी कोणती गोष्ट असेल तर बोटातील सुंदर अंगठी.
तिने या फोटोला रोमँटिक कॅप्शन देत लिहिलंय, ''कोणत्याही अटीशिवाय प्रेम करणे कठीण असते कारण आपल्याला अटी घालण्याची सवय असते. ह्रदयाला फॉलो करणे अवघड आहे कारण मेंदी त्यावर नेहमी दबाव टाकत असतो. मेंदू जिथे अटींवर भर देत असतो तिथे ह्रदय नेहमी विश्वासावर भर देत असते. असे प्रेम बोनससारखे आहे.''
सुश्मिताने पुढे लिहिलंय, ''मैत्री, प्रेम, विश्वास, सोबत आणि ह्रदयाचे ऐकण्यासाठी मी अटींशिवाय तुझी आहे रोहमन शॉल. मी तुझ्यावर प्रेम करते.''
सुश्मिताची ही पोस्ट आणि फोटोतील अंगठी पाहून दोघेही लवकरच बोहल्यावर चढतील असा कयास बांधला जात आहे.