ETV Bharat / sitara

'सूरराई पोतरू' ठरला आयएमडीबीवरील तिसरा हायरेस्ट रेटेड सिनेमा - तमिळ सुपरस्टार सूर्या

सन २०२० मध्ये रिलीज झाल्यावर प्रेक्षक आणि समीक्षकांना आवडलेल्या तमिळ सुपरस्टार सूर्या याची प्रमुख भूमिका असलेला सूरराई पोतरू हा आयएमडीबीवरील आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक रँकिंग चित्रपट ठरला आहे.

Soorarai Pottru
'सूरराई पोतरू'
author img

By

Published : May 17, 2021, 11:04 PM IST

मुंबई - तमिळ सुपरस्टार सूर्या याची भूमिका असलेला सूरराई पोतरू हा चित्रपट आयएमडीबीवरील पहिल्या तीन सिनेमांमध्ये आहे. तामिळ भाषेत बनलेला हा चित्रपट एअर डेक्कन या विमान कंपनीची स्थापना करणाऱया कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित कथा आहे.

द शॉशांक रिडेम्पशन (१९९४) आणि द गॉडफादर (१९७२) नंतर सूरराई पोतरू चित्रपटाने तिसरे सर्वाधिक १० रेटिंगसह तिसरे स्थान मिळविले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अनेक श्रेणींमध्ये या चित्रपटाची निवड ऑस्कर २०२१ साठी झाली होती. अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पात्र असलेल्या ३६६ चित्रपटांपैकी हा एकमेव भारतीय चित्रपट होता. दुर्दैवाने, १५ मार्च रोजी, अधिकृतपणे ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले गेले. ७८ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट फॉरेन फिल्म प्रकारात दाखविल्या जाणाऱया दहा भारतीय चित्रपटांपैकी सूरराय पोतरु याचीही निवड झाली होती.

एअर डेक्कन या कमी किमतीच्या एअर कंपनीचे संस्थापक जीआर गोपीनाथ यांच्या जीवनाची ही काल्पनिक कथा आहे. गेल्या वर्षी थिएटरच्या रिलीजची प्रतीक्षा केल्यानंतर ओटीटीवर रिलीज झालेला हा मोठा तमिळ चित्रपट होता. १२ नोव्हेंबरला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर झाला. दिग्दर्शक सुधा कोंगारा यांच्या दिग्दर्शित या चित्रपटात मोहन बाबू, परेश रावल आणि अपर्णा बालमुराली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.