मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांचीही मुख्य भूमिका आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा अभिनेता म्हणजेच कार्तिकसोबत 'सोनू के टिटू की स्विटी' चित्रपटात झळकलेला सनी सिंग.
होय, सनी सिंगने 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटात 'टिटू'ची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिला होता. चित्रपटाने १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. आता दोघांची जोडी पुन्हा एकदा 'पती, पत्नी और वो' चित्रपटात झळकणार आहे.
कार्तिक आर्यन 'पती, पत्नी और वो' चित्रपटात 'चिंटू त्यागी'ची भूमिका साकारत आहे. त्याने सनी सिंगसोबतचा फोटो शेअर करुन 'सोनू के टिटू चले चिंटू त्यागी से मिलने' असं कॅप्शन दिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -नवाज - अथियाची जोडी असलेल्या 'मोतीचुर चकनाचूर'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित
'पती, पत्नी और वो' चित्रपटाचं दिग्दर्शन मुद्दस्सर अजिज हे करत आहेत. हा चित्रपट १९७८ साली आलेल्या 'पती, पत्नी और वो' याच चित्रपटाचा रिमेक आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सनी सिंगबाबात सांगायचं झालं तर, अलिकडेच त्याच्या 'उजडा चमन' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो टक्कल असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे.
हेही वाचा -अर्चना पुरन सिंगसाठी रोमॅन्टिक गाणं गात होते उदित नारायण, पत्नी आल्यानंतर उडाली तारांबळ