ETV Bharat / sitara

सनी लियोनने सांगितला तिचा मोबाईल नंबर, 'या' युवकाची उडाली झोप - daljeet dosanjh

सनीला बोलण्यासाठी सकाळपासून तर रात्रीपर्यंत अनेकांनी या क्रमांकावर फोन केल्याने त्या युवकाची झोप उडाली आहे. 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना या युवकाने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सनी लियोनने सांगितला तिचा मोबाईल नंबर, 'या' युवकाची उडाली झोप
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:46 PM IST

मुंबई - अभिनेत्री सनी लियोन हिची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. असे असताना जर तिचा मोबाईल नंबरच मिळाला तर काय होईल, याचा अंदाज लावणं कठिण आहे. मात्र, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात ती तिचा मोबाईल नंबर सांगताना दिसते. त्यानंतर मात्र तिच्यामुळे दिल्लीच्या एका युवकाची झोप उडाली आहे.

त्याचं झालं असं की, 'सनीने 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये ती तिचा मोबाईल नंबर सांगताना दिसते. हा मोबाईल नंबर दिल्लीच्या पीतमपुरा येथे राहणाऱ्या एका युवकाचा आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी तो नंबर टिपून घेतला. त्यानंतर या युवकाच्या मोबाईल क्रमांकावर बरेचसे फोन सुरू झाले.

सनीला बोलण्यासाठी सकाळपासून तर रात्रीपर्यंत अनेकांनी या क्रमांकावर फोन केल्याने त्या युवकाची झोप उडाली आहे. 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना या युवकाने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

या युवकाने याबाबत पोलिसांना मदतही मागितली आहे. मौर्या एंक्लेव्ह पोलीस ठाण्यात त्याने याबाबत तक्रारही दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने चित्रपटाचे निर्माते, भूषण कुमार, दिनेश विजान आणि दिग्दर्शक रोहित जुगराज आणि सनी लियोन यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही तयारी दाखवली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.