मुंबई - बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजे संजय दत्तच्या अफेअर्सबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. 'संजू' चित्रपटात त्याच्या गर्लफ्रेन्ड्सचाही उलगडा झाला होता. त्याच्या अभिनय कारकिर्दीसोबतच त्याचे वैयक्तिक आयुष्यही फार चर्चेत राहिलं. त्याचे आत्तापर्यंत ३ लग्न झाले आहेत. मान्यता ही त्याची तिसरी पत्नी आहे. मात्र, आता पुन्हा एकदा संजूबाबा प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संजूबाबाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो पूजा नावाच्या एका मुलीशी रोमॅन्टिक अंदाजात बोलताना पाहायला मिळत आहे. एवढंच काय, तर तो तिला भेटण्यासाठी आतुरही झाला आहे. आपल्या प्रेमाची कबुली देऊन त्याने तिला भेटण्यासाठी वेळ आणि ठिकाणही ठरवलं आहे. त्याच्या या व्हिडिओवरुन तो खरंच प्रेमात वेगेरे पडला की काय, असंच हा व्हिडिओ पाहून वाटतं. पण, थांबा.. ही पूजा दुसरी तिसरी कोणी नसून 'ड्रीमगर्ल' चित्रपटातील 'पूजा' म्हणजेच आयुष्मान खुराना आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
होय, संजय दत्तने आयुष्मानच्या आगामी 'ड्रीमगर्ल' चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरली आहे. त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हटके अंदाजात त्याने 'ड्रीमगर्ल'चं प्रमोशन केलं आहे.
हेही वाचा-चुकून लेडिज वॉशरुमध्ये घुसला होता आयुष्मान, 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनदरम्यान उलगडले धमाल किस्से...!
एकता कपूरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय चाहत्यांना संजूबाबाचा हा अंदाजही आवडल्याचं पाहायला मिळतंय.
संजय दत्त देखील लवकरच 'प्रस्थानम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा-सत्तेसाठी नात्यांचा गळा गोठणाऱ्या राजकारणाची कथा, 'प्रस्थानम'चा ट्रेलर प्रदर्शित