मुंबई - किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या दोघीही एकमेकींच्या खास मैत्रीणी आहेत. एवढंच काय, तर अनन्याच्या बॉलिवूड डेब्युसाठीदेखील सुहानानेच पुढाकार घेतला होता. सुहानाने अलिकडेच तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. सध्या ती तिच्या मित्र मैत्रीणींसोबत वेळ घालवत आहे. अशातच तिचा आणि अनन्याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर या तिघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेन्ड्स आहेत. सोशल मीडियावर तिघीही एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. सुहाना आणि अनन्याचा यापूर्वीदेखील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा सुहाना अनन्यासोबत एका गाण्याच्या ठेक्यावर ताल धरताना पाहायला मिळत आहे.
- View this post on Instagram
My babies ❤💋🌸. • • • cr video 📽 @bollywoodstarskids thank u ❤ #Suhanakhan #ananyapanday
">
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनन्या आणि सुहाना दोघी एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसतात. तर, सुहाना मात्र, तिचा चेहरा लपवते. दोघीही एकमेकींसोबत धमाल करताना या व्हिडिओत पाहायला मिळते.
अनन्या लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. तर, सुहाना देखील बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी तिने एका शार्टफिल्मचे शूटिंग पूर्ण केले आहे.