मुंबई - सुभाष घई हे नाव तसं मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन नाही. बॉलिवूडमध्ये 'शो मॅन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुभाष घई यांनी यापूर्वी मराठीत 'सनई चौघडे', 'वळू' आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'संहिता', या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता घई त्यांच्या मुक्ता आर्ट्स या बॅनरतर्फे विजेता या नव्या चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी गोवा मराठी चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करुन चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तर मुंबईत स्वतः सुभाष घई यांच्याच हस्ते मोठ्या थाटात या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला होता. खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल शेडगे हे करणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'मीडियम स्पायसी' बनून सई ताम्हणकर - ललित प्रभाकर येणार एकत्र
या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर, अभिनेत्री पूजा सावंत देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सुशांत शेलार हा खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. या तिघांशिवाय माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौगुले, तन्वी किशोर, कृतिका तुळसकर, प्रीतम कांगणे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपूरकर, ललित सावंत हे या चित्रपटात काम करताना दिसतील.
- View this post on Instagram
महाराष्ट्र जिंकणारच #vijeta #12March2020 @subhashghai1 @muktaartsltd #amolshedge
">
सुबोध भावेने या चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर शेअर केले आहे. 'हरण्यातून जिंकण्याची जिद्द निर्माण करणारा असतो 'विजेता'', अशी टॅगलाईन असलेले पोस्टरही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
हेही वाचा -Oscar 2020: ऑस्कर पुरस्काराचे मानकरी, वाचा विजेत्यांची यादी
या सिनेमाचं लेखनही स्वतः अमोल शेडगे यांनीच केलं आहे. निर्माते राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै असतील. तर आघाडीचे संगीतकार रोहन हे या सिनेमाला संगीत देणार आहेत. १२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.