ETV Bharat / sitara

एक नाही तर २ चित्रपटांची घोषणा करणार 'किंग खान'? - king khan upcomming projects

शाहरुखचा २ नोव्हेंबरला ५४ वा वाढदिवस आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटांची घोषणा करणार आहे.

एक नाही तर २ चित्रपटांची घोषणा करणार 'किंग खान'?
author img

By

Published : Oct 15, 2019, 11:49 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान 'झिरो' चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्याने आत्तापर्यंत कोणत्या चित्रपटाची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी आतुरता पाहायला मिळते. सोशल मीडियावर विविध हॅशटॅग वापरून शाहरुखला चित्रपटाच्या घोषणेसाठी मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शाहरुख एक नाही, तर दोन चित्रपटांची घोषणा करणार आहे.

होय, शाहरुखचा २ नोव्हेंबरला ५४ वा वाढदिवस आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटांची घोषणा करणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटामध्ये तो भूमिका साकारणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. तर, एस. शंकर यांच्याही एका चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.

हेही वाचा- 'बिग बीं'पेक्षा मोठी आहे शाहरुखची फॅन फोलोविंग, किंग खानने 'असे' मानले आभार

काही दिवसांपूर्वीच शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं, की लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. सध्या तो चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवशी तो चाहत्यांना सरप्राईझ देऊ शकतो, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

हेही वाचा- चांगली अभिनेत्री बनण्यासाठी श्रीदेवींच्या 'या' टीप्स फॉलो करते जान्हवी

Intro:Body:

entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.