ETV Bharat / sitara

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी 'सूर्यवंशी'चं मोशन पोस्टर रिलीज, पाहा खिलाडीचा दमदार लुक - Sooryavanshi motion poster

'सूर्यवंशी'च्या या मोशनपोस्टरमधील अक्षयचा लुक आणि संगीत ट्रेलरची उत्कंठा वाढवण्यात यशस्वी ठरला आहे.

Sooryavanshi Trailer release date, Sooryavanshi Trailer news, Sooryavanshi film release date, akshay kumar latest news, Sooryavanshi Trailer hastag, Sooryavanshi motion poster, Akshay kumar look in Sooryavanshi motion poster
ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी 'सूर्यवंशी'चं मोशन पोस्टर रिलीज, पाहा खिलाडीचा दमदार लुक
author img

By

Published : Mar 1, 2020, 12:09 PM IST

मुंबई - अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जशीजशी जवळ येत आहे तशी या चित्रपटाची उत्सुकता वाढत चालली आहे. उद्या म्हणजेच २ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी 'सूर्यवंशी'च्या रुपात अक्षय कुमारचा दमदार लुक असलेलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

'सूर्यवंशी'च्या या मोशनपोस्टरमधील अक्षयचा लुक आणि संगीत ट्रेलरची उत्कंठा वाढवण्यात यशस्वी ठरला आहे. कारण, अवघ्या काही तासातच हे मोशन पोस्टर सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे.

हेही वाचा -'सूर्यवंशी'ची उत्कंठा शिगेला, तब्बल ४ मिनिटांचा असणार ट्रेलर

अक्षय कुमारने हे मोशन पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. 'सूर्यवंशी'च्या ट्रेलरसाठी सज्ज व्हा, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.

हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील हा चौथा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही भूमिका आहे. अक्षय कुमारसोबत कॅटरिना कैफचीदेखील मुख्य भूमिका आहे. २४ मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.