मुंबई - अभिनेता सूरज पांचोली हा बऱ्याच दिवसांनंतर पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. 'सॅटेलाईट शंकर' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सूरजने या चित्रपटाचे दोन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'सॅटेलाईट शंकर' या चित्रपटाचं दिग्दर्शन इरफान कमल यांनी केलं आहे. या चित्रपटात देशासाठी लढणाऱ्या सैनिकाची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. सीमेवर देशद्रोहींसोबत लढत असतानाच सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या सैनिकाची कथा यामध्ये दाखवण्यात येणार आहे. तसंच, सैनिकाच्या आयुष्यातील संकटही पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -भजनसम्राट अनुप जलोटाची जसलिन मथारुची पुन्हा जमणार जोडी, 'या' चित्रपटात येणार एकत्र
या चित्रपटात सूरजसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री मेघा आकाशनेही भूमिका साकारली आहे. बऱ्याचदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आले. मात्र, आता १५ नोव्हेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिरंजीवीसोबत पाहिला 'सैरा'