मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या फॅन्सना एक गोड बातमी दिली आहे. कुणाल बेनोडेकर या व्यवसायिकाशी 2 फेब्रुवारी रोजी आपला साखरपुडा पार पडला असून लवकरच आपण त्याच्याशी लग्न करणार असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे. अशा या कुणालविषयी अधिक जाणून घेण्यासाठी जरूर वाचा.
मराठी अप्सरा सोनालीला मोहित करण्यात कुणाल बेनोडेकरने बाजी मारली आहे. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ती कशी अडकली याबद्दल ते लवकरच स्पष्टता देईल. मात्र तिला आपल्या मोहजाळात अडकवणारा कुणाल आहे तरी कोण असा प्रश्न पडतो. तो फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाही. तो मॉडेल अथवा खेळाडूही नाही. मग सोनाली आणि त्याच्यात एकत्र येण्यासारखा कोणता समान धागा आहे, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर आहे कुणाल हा उच्चशिक्षित मराठी पोरगा आहे.
कुणाल हा सध्या एएसएल इंटरनॅशनल या कंपनीत काम करतो. दुबईत असलेल्या या चार्टड अकाऊंट बेस कंपनीत तो सिनीयर अॅडजस्टर म्हणून काम पाहतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक गुन्हे, व्यवसायाची नुकसानभरपाई आणि सायबर दावे यासंबंधी तो तज्ञ म्हणून काम करतो.
कुणाल बेनोडेकर याचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्समधून झालंय. इंग्लंड आणि वेल्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएईडब्लू)च्या असोसिएटचे पदही त्याच्याकडे आहे. त्याच्या सोशल मीडियावर लक्ष टाकले तर राजकीय परिपक्वताही त्याच्याकडे दिसून येते. अनेक सामाजिक प्रश्नांवर आपले मते तो मांडत असतात.
अशा प्रकारे सोनाली कुलकर्णी आपल्या उच्चविद्याविभूषित, उच्चपदस्थ कुणालसोबत बोलल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे.