ETV Bharat / sitara

सोनाक्षीच्या 'खानदानी शफाखाना'ची रिलीज डेट बदलली, आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित - varun sharma

चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या या पोस्टरनंतर या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

सोनाक्षीच्या 'खानदानी शफाखाना'ची रिलीज डेट बदलली, आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : Jun 27, 2019, 11:46 AM IST

मुंबई - सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि बादशाह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'खानदानी शफाखाना' चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या या पोस्टरनंतर या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

सोनाक्षीचा खानदानी शफाखाना हा चित्रपट एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित आहे. हा चित्रपट आता २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय की, आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी सोनाक्षीसमोर ६ महिने त्यांचं सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते. अशात सोनाक्षी कशा प्रकारे या गोष्टी हाताळते आणि यादरम्यान होणारे अनेक विनोदी संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.

Khandaani Shafakhana
खानदानी शफाखाना

चित्रपटाची कथा नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी असल्यानं प्रेक्षकांना काहीसं वेगळेपण या चित्रपटात पाहायला मिळेल हे नक्की. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.