ETV Bharat / sitara

सुशांतची जादू ढळली! 'सोन चिडिया'नं केली इतक्या कोटींची कमाई - sushant singh rajput

सुशांत आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.२० कोटींची कमाई केली आहे.

सोन चिडिया
author img

By

Published : Mar 2, 2019, 7:49 PM IST

मुंबई - सुशांत सिंग राजपूतने 'एम.एस धोनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याचा केदारनाथ चित्रपटही हिट ठरला. मात्र, आता सुशांतची चाहत्यांवरील जादू ढळली असून शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'सोन चिडिया' चित्रपटाला प्रेक्षकांचा खास प्रतिसाद मिळाला नाही.

सुशांत आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.२० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या असून चित्रपटाचे शोदेखील कमी असल्याने कमाई जास्त होऊ शकली नसल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. यासोबतच शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत वाढ होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

मागील आठवड्यात अजय देवगणचा 'टोटल धमाल' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमावला तर शुक्रवारीच प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या 'लुका छुपी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.०१ कोटींची कमाई केली आहे. याच चित्रपटांचा फटका 'सोन चिडिया'च्या कलेक्शनला बसला आहे. आता सुशांत आणि भूमीचा 'सोन चिडिया' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतो का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Intro:Body:

son chiriya box office collection

सुशांतची जादू ढळली! 'सोन चिडिया'नं केली इतक्या कोटींची कमाई

मुंबई - सुशांत सिंग राजपूतने 'एम.एस धोनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याचा केदारनाथ चित्रपटही हिट ठरला. मात्र, आता सुशांतची चाहत्यांवरील जादू ढळली असून शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'सोन चिडिया' चित्रपटाला प्रेक्षकांचा खास प्रतिसाद मिळाला नाही.

सुशांत आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.२० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या असून चित्रपटाचे शोदेखील कमी असल्याने कमाई जास्त होऊ शकली नसल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. यासोबतच शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत वाढ होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

मागील आठवड्यात अजय देवगणचा 'टोटल धमाल' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमावला तर शुक्रवारीच प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या 'लुका छुपी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.०१ कोटींची कमाई केली आहे. याच चित्रपटांचा फटका 'सोन चिडिया'च्या कलेक्शनला बसला आहे. आता सुशांत आणि भूमीचा 'सोन चिडिया' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतो का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.