ETV Bharat / sitara

स्मिता तांबेच्या गौराईच्या साडीसाठी आणलं कोल्हापूरवरून खणाचे कापड - गौराईला खणाच्या नऊवाऱ्या नेसवल्या

अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी गौरी आगमन झाले. अत्यंत मनोभावे तिने गौरीची पूजा केली. गौरीला नेसवण्यासाठी तिने खास कोल्हापूरहून खणाची साडी मागवली होती.

स्मिता तांबेच्या घरी गौरी आगमन
author img

By

Published : Sep 7, 2019, 12:11 PM IST

अभिनेत्री स्मिता तांबेचे यंदा 18 जानेवारीला लग्न झाले. स्मिताच्या माहेरी दरवर्षी गौराईचे आगमन होते. यंदा तिच्या सासरी मुंबईमध्ये पहिल्यांदाच गौराई बसल्यात. स्मिताने सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. भक्तिभावाने गौराईची पूजाअर्चा, पाहुणचार केला.

स्मिता तांबेच्या घरी सात दिवसांचे गौरी-गणपती येतात. गणपती बाप्पाची मूर्ती तिचे यजमान धिरेंद्र व्दिवेदी स्वत: हाताने बनवतात आणि स्मिता गणपतीचे वस्त्रांलकरा सजवते. तसेच गौराईसाठीही साडी-चोळी हाताने बनवण्यापासून ते तिचा साजशृंगार करण्यापासून ते नैवेद्य करण्यापर्यंत सगळे स्मिता स्वत:च्या हाताने करते.

गौरी गणपती आणि स्मिता तांबेचे वेगळे नाते आहे. त्याविषयी स्मिता सांगते, “लहानपणापासून गौरी-गणपतीचा सण आल्यावर आगळेवेगळे चैतन्य निर्माण होते. हा सण मला प्रचंड आवडतो. मला लहानपणापासून गौरीचा शृंगार, तिचे दागिने, टिकली, हातावर मेंदी, साडी नेसवणे हे सगळं करायला खूप आवडायचं. आज लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या घरी गौंरी आली आहे.”

ती पुढे सांगते,“एरवी आईच्या हाताखाली गौरी गणपतीसाठी तिला मदत करायचे. यावेळेला पहिल्यांदा हे सगळं मी स्वतः केलं. गौरी-गणपती माझ्या घरी आल्यामुळे मी खूप भावूक झाले आहे. त्यांची पूजाअर्चा, सेवा करताना त्यांच्यात मन रमायला लागतं. मी त्यांच्याशी मनाने एकरूप होते.”

स्मिताने स्वत: गौरीसाठी खणाच्या नऊवारी साड्या बनवल्या आहेत. ती म्हणते. “मी गौराईला खणाच्या नऊवाऱ्या नेसवल्या आहेत. कारण मला खणाचं कापड खूप आवडतं. त्यासाठी कोल्हापूरच्या महलक्ष्मी मंदिराच्या बाहेरून हे कापड खरेदी केलंय. त्या कापडाच्या या नऊवारी साड्या मी नेसवल्या आहेत.”

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.