मुंबई - ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल त्यांची मुल्क चित्रपटातील सहकलाकार तापसी पन्नू हिने काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांच्यासोबतचा एक हळवा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तापसीने शेअर केलेल्या फोटोत ऋषी कपूर आणि तापसी दोघेही मंद हसताना दिसत आहेत. यात ती ऋषी यांच्या गळ्यात पडून भावनिक झालेली दिसत आहे. मुल्क चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. २०१८मध्ये रिलीज झालेल्या मुल्क या चित्रपटात तापसीने ऋषी कपूर यांच्या सुनेची भूमिका साकारली होती.
तापसीने ऋषी कपूर यांच्यासोबत दोन चित्रपटातून भूमिका साकारल्या आपली हॅट्ट्रिक राहिल्याचे दुः ख तिने या फोटोसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.तापसीने चष्मे बद्दुर या चित्रपटात पहिल्यांदा ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केला होता.
ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी ८. ४५ वाजता निधन झाले. संध्याकाळी कुटुंबीय आणि मोजक्या बॉलिवूड सेलेब्रिटींच्या उपस्थितीत मुंबईच्या गिरगावातील चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.