चेन्नई - कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे उपचारासाठी दाखल झालेला गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या दिग्गज गायकला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटर आणि एक्स्ट्रा कोरपोरियल मेब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
७४ वर्षीय गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांनी विविध दक्षिणेकडील भाषांमध्ये आणि भारतातील हिंदीसह इतर भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. त्यांना कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बालसुब्रह्मण्यम यांनी प्रारंभी छातीत त्रास असल्याची तक्रार केली आणि कोरोनाची चाचणीही दिली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ संदेश चाहत्यांना दिला. त्यामध्ये आपणे बरे असून काळजी करु नका, असे त्यांनी म्हटले होते.
तथापि, गेल्या आठवड्यात गायकाची तब्येत बिघडली आणि तेव्हापासून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.