ETV Bharat / sitara

'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' चित्रपटात आजीच्या भूमिकेत ८४ वर्षीय शुभा खोटे - लकडाऊन बी पॉझिटिव्ह

लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे एकाच घरात अडकलेल्या कुटुंबाची आणि नवविवाहित जोडप्याची गोष्ट 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' हा चित्रपट सांगतो. सर्वांची लाडकी आजी म्हणून शुभा खोटे या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार असून, त्यांच्यासारखी आजी सर्वांना मिळो असं प्रेक्षक बोलतील अशी त्यांची भूमिका आहे.

शुभा खोटे
शुभा खोटे
author img

By

Published : Feb 19, 2022, 5:09 PM IST

Updated : Feb 19, 2022, 6:34 PM IST

‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटांतून अभिनयाची कारकीर्द सुरु केलेल्या तरुण अभिनेत्री शुभा खोटे अजूनही अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. सीमा या पहिल्या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत त्या सिनेसृष्टीत रुजू झाल्या, मेहमूद या अष्टपैलू कलाकाराच्या यांच्या सोबत त्यांची जोडी चांगलीच जमली होती. आपल्या या ६९ वर्षाच्या कारकिर्दीत शुभा खोटे यांनी तब्बल ५६ सिनेमामध्ये काम केलं असून आता यात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे ती म्हणजे 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची.

भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास हा एका शतकाहून मोठा आहे. १९१३ ला पहिल्या चित्रपटानंतर भारतीय मनोरंजन सृष्टीचा सुवर्ण काळ सुरु झाला तो म्हणजे ५० ते ८० च्या दशकात, या दशकांत वावरणारे अनेक कलाकार आज 'लेजेंड' म्हणून सिनेसृष्टीत वावरतात आणि अशाच एक लेजेंड म्हणजे शुभा खोटे. १९५३ पासून ते आता पर्यंत त्या मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटात शुभा खोटे यांची महत्वाची भूमिका असून तब्बल ४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे एकाच घरात अडकलेल्या कुटुंबाची आणि नवविवाहित जोडप्याची गोष्ट 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' हा चित्रपट सांगतो. सर्वांची लाडकी आजी म्हणून शुभा खोटे या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार असून, त्यांच्यासारखी आजी सर्वांना मिळो असं प्रेक्षक बोलतील अशी त्यांची भूमिका आहे. या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून शुभा खोटे असून आपल्या नातवाच्या लग्नातली धांदल त्या अनुभवत आहेत. तब्बल ८४ वर्षाच्या शुभा खोटे या चित्रपटाच्या दरम्यान स्वतःहून आघाडी घेत सेट वर सगळ्यांच्या आधी हजर राहत तर सेटवर अनेकदा त्यांनी आपल्या हाताने सगळ्यांसाठी जेवण सुद्धा त्यांनी बनवलं होत.

विनोदी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती इष्णव मीडियाची आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मिता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे. शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश-विश्वजित यांनी दिलं आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.

‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - बप्पी लाहिरी यांच्या अंत्ययात्रेत मिथुन चक्रवर्ती का आला नाही? मिथुनने केला खुलासा

Last Updated : Feb 19, 2022, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.