मुंबई - आज अभिनेते शक्ती कपूर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धाने आपल्या आई वडिलांचा एक जुना फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोमध्ये शक्ती कपूर आणि त्यांच्या पत्नीचा तारुण्यातील लूक पाहायला मिळतो. सोशल मीडियावर या फोटोवर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया मिळत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -मराठमोळी संस्कृती दाखवणारं 'तान्हाजी'चं नवं गाणं प्रदर्शित
श्रद्धा कपूर सध्या तिच्या विविध आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यावर्षी तिचे 'छिछोरे', 'साहो' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली. आता ती वरूण धवनसोबत 'स्ट्रिट डान्सर थ्रीडी' आणि टायगर श्रॉफसोबत 'बागी ३'मध्ये दिसणार आहे. सध्या 'बागी ३'च्या शूटिंगसाठी ती सर्बीया येथे रवाना झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अलिकडेच 'स्ट्रिट डान्सर थ्रीडी' या चित्रपटातील वरुण धवनचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. १८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुणनंतर श्रद्धाच्या फर्स्ट लूकचीही चाहत्यांना आतुरता आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -'गांधी हत्या आणि मी' नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा दिसणार 'नथुराम'