मुंबई - आजच्या या कठिण परिस्थितीमध्ये प्रत्येकजण कोरोना व्हायरस विरुध्दच्या लढाईत योगदान देण्याचा प्रत्येकजण पर्यत्न करत आहे. अशावेळी 'सजना आ भी जा' आणि 'जिंदा हूं मैं' यासारख्या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका शिबानी कश्यप हिने नवे गीत सादर केले आहे. हे गाणे तिने स्वतःच लिहिले असून संगीतबध्दही केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या गाण्याचे शीर्षक आहे 'कोरोना को है हराना'. कोरना रोखण्याची सक्त आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे प्रबोधन या गीतातून करण्याचा प्रयत्न तिने केलाय. व्हायरसच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईला हे गीत तिने समर्पित केले आहे. इन्स्टाग्रामवर तिने हे गीत पोस्ट केले आहे.
शिबानीच्या अगोदर अभिनेत्री दीपशिखा नागपाल और डीजे शेजवुड यांनी 'गो कोरोना गो' हे गाणे रिलीज केले होते.