ॲडीलेड AUS vs PAK ODI Series : पाकिस्तानचा सध्या मेलबर्नमध्ये पहिल्या वनडे हरला आहे. मात्र त्यांच्यासमोर मालिकेत आणखी अडचणी आहेत. आव्हानं राहिली आहेत. कारण यजमान ऑस्ट्रेलियाच्या नजरा 20 वर्षे जुन्या विक्रमाशी बरोबरी करण्यावर आहेत. मेलबर्नमध्ये पाकिस्तानला हरवून त्यांनी जे केलं ते 1988 मध्ये केलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता तो विक्रम ॲडीलेडमध्ये मोडला जाईल आणि त्यानंतर पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात असं घडू शकतं, ज्यामुळं ऑस्ट्रेलियन संघ 20 वर्षांपूर्वी केलेल्या स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी करताना दिसेल.
A quality start to the ODI series!
— cricket.com.au (@cricketcomau) November 4, 2024
The Aussies take the win in a close one in Melbourne #AUSvPAK pic.twitter.com/CjLMFW9DXS
1988 मध्ये केलेल्या विक्रमाची बरोबरी : तुम्ही विचार करत असाल की ऑस्ट्रेलिया असं काय करणार आहे? असा कोणता विक्रम आहे, ज्याची ऑस्ट्रेलिया बरोबरी करणार आहे? त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या विजयाच्या अनुषंगानं दडलं आहे. वास्तविक मेलबर्नचा वनडे सामना जिंकून, ऑस्ट्रेलियानं 1988 मध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक वनडे विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियानं 6 सप्टेंबर 2022 पासून घरच्या मैदानावर सातत्यानं जिंकले वनडे सामने : ऑस्ट्रेलियानं 7 जानेवारी 1988 ते 11 डिसेंबर 1988 दरम्यान सलग 10 वनडे सामने जिंकले होते. पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न वनडे सामन्यातील विजयानंतर त्यांनी 10 विजयांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 6 सप्टेंबर 2022 पासून घरच्या भूमीवर वनडे जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा सिलसिला कायम आहे.
The pacers give it their all in a hard-fought contest at the MCG!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2024
Australia win the first ODI by two wickets 🏏#AUSvPAK pic.twitter.com/33tlPGH7Ap
20 वर्षे जुन्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी : आता, ऑस्ट्रेलियन संघानं पाकिस्तानविरुद्धचे पुढील दोन वनडे जिंकले, म्हणजे मालिका क्लीन स्वीप केली, तर त्यांना 20 वर्षांपूर्वी केलेल्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करेल. ऑस्ट्रेलियानं 11 जानेवारी 2003 ते 16 जानेवारी 2004 दरम्यान घरच्या भूमीवर सलग 12 वनडे सामने जिंकले आहेत, हा त्यांचा विक्रम आहे. 6 सप्टेंबर 2022 पासून, ऑस्ट्रेलियानं घरच्या मैदानावर 10 वनडे सामने जिंकले आहेत. म्हणजेच सध्याच्या वनडे मालिकेत ॲडलेड आणि पर्थमध्ये पाकिस्तानला हरवल्यास 20 वर्षांपूर्वी केलेल्या विक्रमाची बरोबरी होईल.
मेलबर्न वलनडे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 2 गडी राखून मिळवला विजय : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं 2 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम खेळताना 203 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 99 चेंडू शिल्लक असताना 204 धावांचं लक्ष्य गाठलं.
हेही वाचा :