ETV Bharat / sitara

'तान्हाजी' चित्रपटातील शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूक, तर जिजाऊंच्या भूमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री - 'तानाजी - द अनसंग वॉरिअर'

या चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा मावळा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायाल मिळणार आहे. त्यांच्या भूमिकेतील अजय देवगणचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. मात्र, या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार, यावरचा पडदाही दुर सारला आहे.

'तान्हाजी' चित्रपटातील शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूक, तर जिजाऊंच्या भूमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री
author img

By

Published : Nov 14, 2019, 9:26 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून आतुरता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा मावळा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायाल मिळणार आहे. त्यांच्या भूमिकेतील अजय देवगणचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. मात्र, या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार, यावरचा पडदाही दुर सारला आहे.

मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणने ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ ट्विट करत शरद केळकरचा शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

शिवरायांच्या भूमिकेतील शरदचा लूक हा सर्वांचं लक्ष वेधुन घेणारा आहे. शिवरायांप्रमाणेच करारी लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो.

तसेच, जिजाऊंची भूमिकेत अभिनेत्री पद्मावती राव झळकणार आहेत. 'जब तक कोंढाणा पे भगवा नही लेहराता, हम जुते नही पेहनेंगे', असे ट्विट करुन अजयने जिजाऊचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे. चित्रपटातील हे लूक पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

बिग बजेट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

MP sambhaji raje comment on maharashtra political 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.