मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये रणवीर सिंग गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत आता एका सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचीही वर्णी लागली आहे.
'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे या चित्रपटात रणवीरसोबत भूमिका साकारणार आहे. विजय देवरकोंडासोबत तिने साकारलेली 'अर्जुन रेड्डी'मध्ये 'प्रिती'ची भूमिका साकारली होती. आता 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाच्या निमित्ताने ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शालिनीने 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात साकारलेली प्रितीची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. आता गुजराती तरुणीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीरसोबत भूमिका साकारण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं शालिनीने सांगितलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'दबंग ३' चा क्लायमॅक्स 'असा' असेल भव्य!!
दिव्यांग ठक्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, मनिष शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात रणवीर 'जयेशभाई'चे पात्र साकारत आहे. स्त्री- पुरूष समानता या विषयावर आधारित हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. रणवीरच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याचा एकंदर लूक पाहता या चित्रपटाच्या कथानकाविषयी कुतूहल व्यक्त केलं जात आहे.
- View this post on Instagram
JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! 🤓💗💪🏾 #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf
">
हेही वाचा -'बाजीप्रभू देशपांडे'वर मराठीत येणार ३ कलाकृती
रणवीर सध्या त्याच्या '८३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.