मुंबई - अभिनेता शाहिद कपूर 'जर्सी' चित्रपटाच्या सेटवर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे त्याला टाके बसले आहेत. त्यामुळे तो पत्नी मीरासोबत मुंबईला परत आला आहे. त्याला मुंबई विमानतळावर मीरासोबत स्पॉट करण्यात आले.
शाहिदच्या ओठांवर जखम झाल्यामुळे त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क घातले होते. घरी परतल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे.
-
Thank you for all the concern. Yes I have got a few stitches but am recovering fast. #jersey has taken a little bit of my blood but a script this good deserves that in the least. Have a good one you all. Keep it real. Make it count. Spread the love. Humanity above all.
— Shahid Kapoor (@shahidkapoor) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you for all the concern. Yes I have got a few stitches but am recovering fast. #jersey has taken a little bit of my blood but a script this good deserves that in the least. Have a good one you all. Keep it real. Make it count. Spread the love. Humanity above all.
— Shahid Kapoor (@shahidkapoor) January 12, 2020Thank you for all the concern. Yes I have got a few stitches but am recovering fast. #jersey has taken a little bit of my blood but a script this good deserves that in the least. Have a good one you all. Keep it real. Make it count. Spread the love. Humanity above all.
— Shahid Kapoor (@shahidkapoor) January 12, 2020
सुत्रांच्या अनुसार, शाहिद 'जर्सी'च्या शूटिंगदरम्यान क्रिकेटची तयारी करत होता. तेव्हा त्याला अचानक बॉल लागला. त्याच्यावर लगेच उपचार करण्यात आले. मात्र, ओठांना टाके लागल्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले आहे. शाहिदची पत्नी मीरा त्याला भेटण्यासाठी चंदिगढ येथे गेली होती. तिच्यासोबत तो मुंबईत परत आला.
हेही वाचा -पंतग महोत्सवात सहभागी झाले वरुण - श्रद्धा, 'स्टीट डान्सर'चं केलं प्रमोशन
'जर्सी' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'जर्सी'चा रिमेक आहे. गौतम तिन्नाऊरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी व्हर्जनचेही दिग्दर्शन तेच करत आहेत. अमन गील आणि दिल राजू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात शाहिद कपूरसोबत भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा -अभिनेत्यानंतर खासदार बनलेला सनी देओल हरवला!, काय आहे प्रकरण?
शाहिदचा मागच्या वर्षी 'कबीर सिंग' हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट देखील 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. आता पुन्हा एकदा तो 'जर्सी'च्या रिमेकमध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.
-
#jersey #prep pic.twitter.com/0huoKgK0Wo
— Shahid Kapoor (@shahidkapoor) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#jersey #prep pic.twitter.com/0huoKgK0Wo
— Shahid Kapoor (@shahidkapoor) November 21, 2019#jersey #prep pic.twitter.com/0huoKgK0Wo
— Shahid Kapoor (@shahidkapoor) November 21, 2019
हेही वाचा -Exclusive Interview: सनी सिंग आणि सोनाली सेहगलने उलगडला 'जय मम्मी दी' चित्रपटाचा प्रवास