ETV Bharat / sitara

अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात, पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर घडली दुर्घटना - Shabana Azami injured in road accident

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीत अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला.

Shabana Azami injured in road accident near khopoli raigad
अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात
author img

By

Published : Jan 18, 2020, 5:04 PM IST

Updated : Jan 18, 2020, 7:52 PM IST

रायगड - मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीत अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना सुरुवातीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना एम जी एम रुग्णालयातून अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तर देखील या कारमध्ये उपस्थित होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद अख्तर यांचा १७ तारखेला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी ते पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

खालापूर टोल नाक्याजवळ शबाना आजमी यांच्या एमएच २ सी झेड ५३८५ या क्रमांकाच्या कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली होती. त्यामुळे हा अपघात घडला. शबाना आझमी यांच्या नाक आणि तोंडाला मार लागला आहे. शबाना यांच्यासह कारच्या चालकालाही दुखापत झाली आहे.

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात शबाना आझमी यांच्या कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

शबाना आझमी यांची प्रकृती आता स्थिर आहे.

अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात, पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर घडली दुर्घटना

Intro:रायगड ब्रेकिंग

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीत कारचा अपघात

अभिनेत्री शबाना आजमी अपघातात जखमी

एम जि एम रुग्णालयात दाखल केले असल्याची माहितीBody:रायगड अपघातConclusion:रायगड अपघात
Last Updated : Jan 18, 2020, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.